14/05/2026
🔱 हर हर महादेव 🔱
शंभू महाराज, आज आपला जन्मोत्सव....
आम्ही आज हात जोडून, डोळ्यात अश्रू आणि हृदयात कृतज्ञतेचा पूर घेऊन तुम्हाला हे पत्र लिहित आहे.
#महाराज, तुमच्या जीवनावर सिनेमा काढण्याची संधी आम्हाला मिळाली, ही केवळ एक संधी नव्हती. हा आमच्या, माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि भावनिक अनुभव होता. जेव्हा आम्ही तुमच्या चरित्राचा अभ्यास करत होतो, तेव्हा प्रत्येक पानावर आम्ही तुम्हाला जिवंत पाहिले. स्वतःच्या खूप छोट्याश्या आयुष्यात आणि मुघलांच्या अमानुष यातनांमध्येही ज्या धैर्याने, स्वाभिमानाने आणि धर्मरक्षणाच्या ज्वालाने तुम्ही स्वतःला उभे केले ते पाहून माझा व आमच्या आत्माच थरारला.
तुम्ही केवळ एक राजा नव्हते महाराज, तुम्ही स्वातंत्र्य, शौर्य आणि मातृभूमी यांचे जिवंत प्रतीक होता. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूसमोर तुम्ही डोके झुकवले नाही, धर्म सोडला नाही, आणि मराठा स्वाभिमानाची ज्योत मंद होऊ दिली नाही. तुमच्या बलिदानाने मला शिकवले की खरे नेतृत्व म्हणजे केवळ जिंकणे नव्हे, तर गरज पडली तर हसत हसत मृत्यू स्वीकारणेही होय.
जेव्हा आम्ही कॅमेऱ्यासमोर तुमची भूमिका कलाकारांमध्ये जगत होतो, तेव्हा अनेक रात्री तुमच्या आमच्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे डोळ्यात केवळ पाणी होते. कारण तुमच्या यातनांची कल्पनाही करणे अशक्य होते. तरीही तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आणि विश्वास होता, तो मला आजही प्रेरणा देतो. महाराज, तुम्ही आम्हाला, मला तुमच्या आयुष्यावर फक्त एक चित्रपट बनवायची संधीच नाही, तर माझ्या आत्म्याला एक नवी दिशा दिली. तुमच्या जीवनाने मला शिकवले की इतिहास सांगण्यापेक्षा इतिहास जगणे किती मोठे आहे.
महाराज, आजआम्ही जेव्हा तुमच्या नावाने लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि छातीमध्ये अभिमान पाहतो, तेव्हा मला वाटते की माझे काम थोडेसे तरी सार्थ झाले. पण खरे सत्य हे आहे की मी तुम्हाला तेवढं दाखवू शकलो नाही जेवढे तुम्ही खरोखर होते. तुमचे तेज, तुमचे बलिदान, तुमची माया या मराठी मातीसाठी.हे शब्दांत किंवा दृश्यांत कधीही पूर्णपणे साकारता येणार नाही पण फुल ना फुलांची पाकळी म्हणून तो प्रयत्न मी आयुष्यभर करेल.. तरीही तुम्ही आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आम्ही तुमचा ऋणी आहेत ……
आम्ही फक्त एक छोटेसे चित्रपट निर्माता आहे, पण तुमच्या चरणी मी, आमचे माझे मन, माझे श्रम आणि माझे सगळे प्रेम अर्पण करतो. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मीही माझ्या क्षेत्रात प्रामाणिक राहील आणि मराठी माणसाच्या शौर्याची ज्योत मंद होऊ देणार नाही, याची शपथ घेतो.
जय भवानी, जय शिवराय 🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
तुमचा कायमचा ऋणी आणि भक्त,
तुमच्या जीवनावर सिनेमा काढणारा एक साधा मराठी माणूस - संदीप मोहिते पाटील 🙏
#उरवीता_प्रोडक्शन, #शिवनेरी_फाउंडेशन, #धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी, चित्रपट भाग-१, तसेच सर्व सदस्य मोहिते-पाटील मित्र परिवार, पुणे.
🚩जयतु शिवभूपती, जयतु शंभू छत्रपती🚩
Youtube:
https://youtube.com/?si=uNKdU3DvghRKNOkG