24/07/2026
‘मॉर्निंग’, ‘मॅटिनी’ आणि ‘फर्स्ट शो’...
नऊ तासांचा नाविन्यपूर्ण मास्टरक्लास; इंडस्ट्रीतल्या दिग्गजांचे लाभणार मार्गदर्शन
मित्रहो, चित्रपट निर्मितीच्या तुमच्या स्वप्नाला आता पंख मिळणार! तुमची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांच्या जोडीला आता आहे ‘FILMI कीडा’ चे उपयुक्त मार्गदर्शन. प्रोड्यूसर म्हणून यश, कीर्ती, आणि समृद्धी मिळवण्याची तुमची मनीषा आम्ही जाणतो; आमच्या मास्टरक्लासची आखणी व नियोजन देखील आम्ही तसेच केले आहे.
ब्रेकफास्ट आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यांनतर फिल्म प्रॉडक्शनच्या सत्राला सुरुवात होईल. ह्या सेशनमधेय चित्रपट निर्मितीचा श्रीगणेशा करण्यापासून ‘मास्टर’ काढ्ण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत निर्मात्यांची जबाबदारी, भूमिका आणि कार्य यांबाबत सखोल मार्गदर्शन तुम्हाला मिळेल.
दुपारी बारा वाजता म्हणजेच ‘मॅटिनी’ च्या वेळेत, सिनेमा तयार झालायनंतर त्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कशी निर्माण करायची आणि स्क्रीन पर्यंत प्रेक्षकांना कसे खेचून आणायचे, अर्थात मार्केटिंग विषयी सविस्तर उहापोह होणार आहे. लंच ब्रेक नंतर हे सत्र पुढे सुरु राहील.
शेवटी ‘फर्स्ट शो’ च्या वेळेत सुरु होईल डिस्ट्रिब्युशन विषयीचे सत्र, ज्यामध्ये तयार झालेला सिनेमा प्रत्यक्ष चित्रपटगृहात प्रदर्शित कसा करायचा याचा सखोल आढावा घेतला जाईल. जास्तीतजास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन करिता काय डिस्ट्रिब्युशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि ती व्यवहारात कशी राबवायची, याचे ज्ञान तुम्हाला मिळेल. हाय टी नंतर Q & A Session पार पडेल.
मंडळी, कोणत्याही वर्कशॉपला त्या विषयातील अनुभवी व जाणकार मंडळी लाभली तरच त्या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त होते. ‘FILMI कीडा’ सुद्धा याला अपवाद नाहीये बरं. फिल्म डिस्ट्रिब्युटर व क्शनलटन्ट डॉ. अजय फुटाणे (चीफ मेंटर) यांच्या व्यतिरिक्त या मास्टरक्लास मध्ये मराठी सिनेसृष्टीशी निगडित निवडक दिग्गजांचे मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे.
त्वरा करा आणि लवकरच संपणाऱ्या Early Bird Offer चा लाभ घ्या!
अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क:
प्रशांत जोशी - 8407982444 (WA)